ओबीसी एल्गार महामोर्चासाठी राज्यभरातून जनसागर नांदेडकडे : न्यायहक्कासाठी २९ ऑक्टोबरला ‘चलो नांदेड’चा जयघोष!

नांदेड, ता.२० : ओबीसी, भटके-विमुक्त, बलुतेदार आणि मायक्रो ओबीसी समाजबांधवांनी आपले हक्क व न्याय मिळवण्यासाठी २९ ऑक्टोबर २०२५ रोजी नांदेड येथे भव्य “ओबीसी एल्गार महामोर्चा” आयोजित केला आहे. “चलो नांदेड” या घोषणा देत राज्यभरातून समाजबांधवांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. हा महामोर्चा बुधवार, सकाळी ११ वाजता कृ.उ.बा.स. मैदान, जुना मोंढा येथून प्रारंभ होणार असून अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर जाहिर सभा होणार असून विविध जिल्ह्यातील मान्यवर मार्गदर्शक व नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत. प्रमुख मागण्या : २ सप्टेंबरचा ओबीसी विरोधी शासन निर्णय तात्काळ रद्द करावा. महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना त्वरित करावी. ५८ लाख बेकायदेशीर कुनबी नोंदी रद्द कराव्यात. प्रत्येक जिल्हा व तालुक्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची निर्मिती करावी. या मागण्यांसाठी समाजाने एकत्र येऊन लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आयोजक समितीने ओबीसी समाजातील सर्व घटकांना “आपल्या भावी पिढीच्या भवितव्यासाठी नांदेडला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहा” असे आवाहन केले आहे. हा महामोर्चा शांततामय आणि संघटित पद्धतीने पार पाडण्यासाठी नांदेड जिल्हा ओबीसी, भटके विमुक्त, बलुतेदार, मायक्रो ओबीसी समन्वय समिती सक्रिय झाली असून सर्व स्तरावर नियोजन सुरू आहे. संपर्क : मोर्चाच्या अधिक माहितीसाठी — 📞 9405773007, 9823694205, 9890207994, 9096182888, 9921535746, 9372245275
Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp