Type Here to Get Search Results !

उद्योजकतेस नवे बळ : आंबेडकरवादी मिशनतर्फे “उद्योजक मार्गदर्शन परिषद”

नांदेड, दि.२०: आंबेडकरवादी मिशन, सिडको नांदेड यांच्या वतीने “उद्योजक मार्गदर्शन परिषद” या भव्य कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी (दि.३१) २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता आंबेडकर चौक, सिडको येथे करण्यात आले आहे. या परिषदेत विविध क्षेत्रातील यशस्वी उद्योजक, प्रशासकीय अधिकारी आणि उद्योग विभागातील मान्यवर मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. वैभव वाघमारे (IAS), Dy. Development Commissioner (Industries) व Controlling Officer (Maitri) हे मार्गदर्शन करणार आहेत. प्रमुख उपस्थितीत मा. आर. के. सिंग (उद्योजक, बुलंदशहर, उत्तर प्रदेश – राष्ट्रपती व मुख्यमंत्री पुरस्कार विजेते), मा. अमोल इंगळे (जी.एम., DIC नांदेड), मा. अनिल कदम (जी.एम., DIC हिंगोली), मा. आर. सांगलीकर (उद्योजक, सांगली), मा. शंकर पवार (प्रोजेक्ट ऑफिसर, ED नांदेड), मा. बालाजी कंठेवाड (शरण उद्योजक, नांदेड) आणि मा. अशोक जोंधळे (त्रिधारा, उद्योजक) आदींचा समावेश आहे. यावेळी जिल्ह्यातील नामवंत उद्योजकांचा विशेष सत्कार करण्यात येणार असून त्यात मा. मारोती कंठेवाड, मा. मधूकर गच्चे, मा. शिवराज टोम्पे, मा. प्रकाश नगारे, मा. प्रदीप वाघमारे, मा. दीपक मांजरमकर, मा. प्रदीप रोकडे (बीड), मा. भगवान धबडगे (पी. आय. राष्ट्रपती पुरस्कार विजेते), मा. स्वप्नील नरबाग, मा. माधव डोम्पले, मा. गौतम कांबळे, मा. देविदास रंगदळ, मा. सुरेश भाले, मा. प्रसेनजित वाघमारे, इंजि. प्रशिक रमेश चित्ते (आपुलकी मिल्क पार्लर), मा. केशव जोंधळे व मा. सूर्यकांत गदेवार यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे आयोजन मा. दीपक कदम (प्रमुख, आंबेडकरवादी मिशन) यांच्या संकल्पनेतून करण्यात आले असून, उद्दिष्ट आहे – आंबेडकरवादी विचारसरणीच्या आधारे युवकांना उद्योग क्षेत्रात प्रोत्साहन देऊन स्वावलंबी बनवणे. 📍स्थळ: आंबेडकरवादी मिशन, सिडको, आंबेडकर चौक, नांदेड 🕚 वेळ: सकाळी ११.०० वा. 📞 संपर्क: 09326932049 / 09370753059

Post a Comment

0 Comments