उज्वला पडलवार अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्य सचिवपदी निवड

नांदेड,दि.६ : किनवट तालुक्याची भूमिपुत्र व सेंटर आॅफ ट्रेड युनियन्स ('सिटू ',) या कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्षा तसेच आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या अध्यक्षा उज्वला पडलवार यांची अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्य सचिवपदी नुकतीच निवड झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे नांदेड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दि. ४ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे पार पडलेल्या अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अकराव्या राज्यस्तरीय अधिवेशनात ही निवड करण्यात आली. या अधिवेशनात विविध पदांवर सर्वानुमते निवडी झाल्या असून, राज्याध्यक्षपदी शुभा शमीम, कार्याध्यक्षपदी चंदा मेंढे, राज्य महासचिवपदी संगीता कांबळे, तर कोषाध्यक्षपदी आरमायटी इराणी यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच भोकर येथील शिवाजी गायकवाड यांची राज्य कौन्सिल सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे मराठवाड्यातील संघटनात्मक बळकटी वाढेल, असा विश्वास सिटू व महिला कर्मचाऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.
Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp