Type Here to Get Search Results !

सरपंच मंगेश साबळे यांच्या आमरण उपोषणास किनवट तालुक्यातून पाठिंबा!

किनवट,दि.६ : गेवराई वायगा (ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील सरपंच मंगेश साबळे यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर मागील आठ दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला किनवट तालुक्यातूनही जोरदार पाठिंबा देण्यात आला आहे. आज(दि.६) मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष दगडू विठ्ठलराव भरकड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून सहाय्यक जिल्हाधिकारी, किनवट यांच्यामार्फत निवेदन सादर केले. या निवेदनात सरपंच मंगेश साबळे यांच्या मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, “शेतकऱ्यांची कर्जमाफी, ओला दुष्काळ, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मंगेश साबळे यांचे उपोषण हे पूर्णपणे रास्त आहे. शासनाने तात्काळ दखल घ्यावी; अन्यथा किनवट तालुक्यातही तीव्र आंदोलन छेडले जाईल.” या प्रसंगी वैजनाथ करपुडे पाटील, चेतन क-हाळे, आभिलाष गुंजकर, नागनाथ भालेराव, सुशिल कदम, अमरदीप सुरोशे, बाबु पवार, भगवानसिंग आदींची उपस्थिती होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करत सर्वांनी एकमुखाने शासनाने त्वरीत सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा येत्या काळात मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

Post a Comment

0 Comments