OBC समाजात शिक्षणक्रांतीसाठी आंबेडकरवादी मिशनकडून ‘OBC शिक्षणक्रांती परिषद 2025’
October 07, 2025
0
नांदेड ,ता.७ : OBC समाजात शिक्षणक्रांती घडवून सामाजिक ऐक्य, बंधुत्व आणि भाईचारा प्रस्थापित करण्यासाठी आंबेडकरवादी मिशनतर्फे ‘OBC शिक्षणक्रांती परिषद – 2025’ व बंधुत्व-सामाजिक ऐक्य राज्य अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी सांगितले.
ही परिषद गुरुवार, दि. 09 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता डॉ. आंबेडकर चौक (लातूर कॉर्नर), सिडको, नांदेड येथील आंबेडकरवादी मिशन येथे पार पडणार आहे, अशी माहिती आंबेडकरी 
या परिषदेच्या प्रमुख मार्गदर्शकांमध्ये डॉ. मनिष कोकरे (डायरेक्टर, SGSG अभियांत्रिकी महाविद्यालय, नांदेड), माजी शिक्षण संचालक नंदन नांगरे व गोविंद नांदेडे, प्रा. आर.डी. शिंदे, प्रा. फ्रिडम माळी, सटवाजी माचनवाड आणि प्रा. संतोष शिंदे यांचा समावेश आहे.
तर प्रमुख उपस्थितीत समता परिषद नांदेड जिल्हाध्यक्ष मिलिंद बनसोडे, OBC राज्य निमंत्रक नामदेव आईलवाड, नारायण अंभुरे, दिगांबर मोरे, माजी अभियंता मधुकर गच्चे आणि उद्योजक डॉ. यशवंत चव्हाण यांची उपस्थिती राहणार आहे.
या परिषदेतून OBC विद्यार्थ्यांना देश-विदेशातील सर्वोच्च शिक्षणाच्या संधी, UPSC/MPSC तसेच इतर उच्च पदांच्या स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन दिले जाणार आहे. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार असून, निवडक होतकरू विद्यार्थ्यांना NEXT IAS संस्थेच्या बॅचमध्ये निःशुल्क प्रवेश दिला जाणार आहे.
OBC समाजात शिक्षणक्रांती घडवण्याच्या दिशेने हे अभियान परिवर्तनाचा नवा टप्पा ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
Post a Comment
0 Comments