Type Here to Get Search Results !

किनवट नगर परिषद निवडणूक २०२५ : उमेदवारी अर्जांची विक्रमी नोंद

 किनवट, दि.१७ : किनवट नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आज मोठी उसळी पाहायला मिळाली. नगराध्यक्ष पदासाठी तब्बल १८ अर्ज, तर नगरसेवक पदासाठी १५७ अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीची रंगत अधिकच वाढली आहे.

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर उमेदवारांच्या उत्साहात सातत्याने वाढ होत गेली. १० ते १७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत नगराध्यक्ष पदासाठी एकूण २८ अर्ज, तर नगरसेवक पदासाठी २६७ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

प्रभागनिहाय गाठी-भेटी, संभाव्य आघाड्या आणि स्थानिक स्तरावरील विविध राजकीय हालचालींमुळे इच्छुक उमेदवारांची धांदल अधिकच वाढल्याचे चित्र दिसत आहे. सर्वच पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही मतदारांचा कौल मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

नव्या उत्साही चेहऱ्यांसोबतच अनुभवी नेत्यांचीही भक्कम तयारी लक्षात येत असून, आगामी काही दिवसांत निवडणूक आणखी रंगतदार होणार, याचे संकेत स्पष्टपणे दिसत आहेत.



Post a Comment

0 Comments