Type Here to Get Search Results !

भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तरीनिमित्त दादर येथे ‘संविधान महोत्सव-जागृती परिषद’ आंबेडकरी स्त्री संघटनाच्या पुढाकाराने भव्य कार्यक्रमाचे आयोजन

 मुंबई,ता.२५  : भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तरीनिमित्त आंबेडकरी स्त्री संघटनतर्फे “जागर संविधान संस्कृतीचा – मेत्ताभावनेचा” या शीर्षकाखाली भव्य संविधान महोत्सव-जागृती परिषद दादर (पूर्व) येथील आंबेडकर भवनमध्ये २५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते सायं. ६ या वेळेत संपन्न होणार आहे. संविधान मूल्यांची जनजागृती आणि सामाजिक सलोखा दृढ करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग या परिषदेचे विशेष आकर्षण ठरणार आहे.

परिषदेच्या उद्घाटन सत्राला सुप्रसिद्ध अभिनेते व कवी मा. डॉ. मिलिंद शिंदे हे उपस्थित राहून उद्घाटन करतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रख्यात लेखिका, कवयित्री व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. प्रज्ञा दया पवार असतील. तर दिवसअखेरच्या समारोप सत्रात प्रख्यात लेखक, वैद्यकीय संशोधक व सामाजिक विचारवंत प्रा. डॉ. राम पुनियानी मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यक्रमाचे सत्रवार आयोजन पुढीलप्रमाणे आहे :

  • उद्घाटन सत्र : सकाळी १० ते दुपारी १
  • मध्यंतर : दुपारी १ ते २
  • संविधानमूल्याधिष्ठित सांस्कृतिक कार्यक्रम : दुपारी २ ते ३
  • टॉक शो : दुपारी ३ ते ४.३०
    या सत्रात सुनील खोब्रागडे, राही भिडे, चयनिका शाह, डॉ. कुंदा प्र. नि., हसीना खान यांचा सहभाग राहणार आहे.
  • समारोप सत्र : दुपारी ४.३० ते सायं. ६

या महोत्सवाचे निमंत्रक प्रा. आशालता कांबळे असून नंदा कांबळे, पुष्पा धाकतोडे, शिरीन लोखंडे, छाया खोब्रागडे, डॉ. निशा शेंडे, श्यामल गरुड, शारदा नवले, छाया कोरेगावकर, माधुरी शिंदे, सुरेखा पैठणे, वैभवी अडसूळ व मयुरा सावी यांची सुकाणू समिती कार्यक्रमाचे नियोजन पाहत आहे.

कार्यक्रमस्थळी चहा, नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

संविधान मूल्यांची सखोल जाण, सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि सामाजिक सौहार्दाचा संदेश देणारी ही परिषद नागरिकांसाठी एक प्रेरणादायी व्यासपीठ ठरणार आहे.


Post a Comment

0 Comments