चंद्रपूर, ता.२० : जिजाऊ ब्रिगेडतर्फे आयोजित महाअधिवेशनासाठी चंद्रपूर शहर सज्ज झाले आहे. प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात २१, २२ व २३ नोव्हेंबर २०२५ रोजी हा महोत्सव पार पडणार आहे. राज्यभरातून हजारो महिला व कार्यकर्त्यांची उपस्थिती अपेक्षित असून, संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी महत्त्वाचे दिशानिर्देश ठरणारे विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
महाअधिवेशनाचा उद्घाटन समारंभ २१ नोव्हेंबर रोजी सायं. ६.३० वाजता होणार असून या वेळी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अधिवेशनाचे अध्यक्षस्थान स्नेहा
राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध मान्यवर या महाअधिवेशनात मार्गदर्शन करणार आहेत. त्यामध्ये—
• मा. सीमाताई बोके, प्रदेशाध्यक्ष
• मा. खा. प्रतिभाताई धानोरकर, खासदार, चंद्रपूर–वणी–आर्णी लोकसभा क्षेत्र
• मा. मीनाताई वासाडे, प्रसिध्द उद्योजिका, चंद्रपूर
• मा. डॉ. स्नेहा खेडेकर, महासचिव
• प्रा. डॉ. शिल्पा आठवले
• मा. प्रियंका भारती, प्रवक्ता, राष्ट्रीय जनता दल, पटणा (बिहार)
• प्रा. डॉ. शरद बाविस्कर, जे.एन.यू., नवी दिल्ली
याशिवाय, महिलांच्या नेतृत्वविकासाला चालना देणाऱ्या विविध विषयांवरील व्याख्यान, चर्चासत्रे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी अधिवेशन उजळून निघणार आहे.
महाअधिवेशनानंतरची जिजाऊ अभिवादन रॅली ही आणखी एक आकर्षण ठरणार असून ती २९ नोव्हेंबर २०२५ रोजी दु. ४.०० ते ६.०० या वेळेत मातृशक्तीचा उत्साह उंचावणार आहे.
जिजाऊ ब्रिगेडच्या या भव्य आयोजनामुळे चंद्रपूरमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, महिलांच्या संघटित शक्तीचे हे प्रभावी दर्शन ठरणार आहे.
![]() |

Post a Comment
0 Comments