मुंबई, दादर : रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने “संविधान सन्मान सोहळा – उत्सव लोकशाहीचा : संविधान जलसा” हा भव्य कार्यक्रम येत्या सोमवार, दि. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी सायं. ६ वाजता श्री शिवाजी नाट्य मंदिर, दादर (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यात रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे सरसेनानी मा. आनंदराज आंबेडकर साहेब हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात “WE THE PEOPLE – सन्मान संविधानाचा” या भावपूर्ण सांस्कृतिक सादरीकरणासह पुरस्कार वितरण आणि प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
संगीतकार जॉली मोरे आणि शाहिरा सीमा पाटील यांची खास प्रस्तुती या जलशाची शोभा वाढवेल. लोकशाहीच्या मूल्यांप्रती जनजागृती आणि संविधान सन्मानाचा संदेश देण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला असून, नागरिकांना QR कोड स्कॅन करून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे संयोजक म्हणून मा. विवेक बनसोडे (महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष) आणि मा. आशिष गाडे (महासचिव, महाराष्ट्र तसेच मुंबई अध्यक्ष) कार्यरत आहेत.
रिपब्लिकन सेना, रिपब्लिकन कामगार सेना, रिपब्लिकन युवा सेना आणि रिपब्लिकन महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हा संविधान सन्मान सोहळा आयोजित करण्यात येत असून, लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी सर्व स्तरातील नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments