Type Here to Get Search Results !

टिळक भवनमध्ये काँग्रेसची रणनीती बैठक; नांदेड निवडणुकीसाठी संयुक्त आघाडीचा बिगुल




मुंबई : 
टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली राज्य निवड मंडळाची महत्वपूर्ण बैठक नुकतीच संपन्न झाली. आगामी नगरपालिका आणि विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्याचा सविस्तर निवडणूक अहवाल जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीने या बैठकीत सादर केला.

ओबीसी समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वाला प्राधान्य देत, ओबीसी प्रवर्गातील राखीव जागांवर केवळ ओबीसी उमेदवारांनाच संधी देण्याचा ठराव बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील बदलत्या राजकीय समीकरणांचा विचार करून वंचित बहुजन आघाडी बरोबर संयुक्त आघाडीने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही प्रदेश नेतृत्वास देण्यात आली.

या बैठकीस हर्षवर्धन सपकाळांसह माजी मंत्री अमित (भैया) देशमुख, सतेज पाटील, विश्वजित कदम, माणिकराव ठाकरे, खासदार रजनी पाटील, कल्याणजी काळे, डॉ. शिवाजी काळगे, प्रा. यशपाल भिंगे, हत्ती हंबीरे, डॉ. गणेश पाटील, हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माधवराव पाटील जवळगावकर, राजेश पावडे, डॉ. श्रावण रॅपनवाड, धनराज राठोड, बालाजी चव्हाण यांच्यासह निवड समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत घेतलेल्या निर्णयांमुळे नांदेड जिल्ह्यातील निवडणूक तयारीला नवे दिशानिर्देश मिळत असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.


Post a Comment

0 Comments