नांदेड : बौद्ध समाजात परस्पर ऐक्य, मैत्री आणि सामाजिक संघटन यांची नितांत गरज असल्याचे सांगत आंबेडकरवादी मिशन नवयान तर्फे देशभरातील बौद्ध उपासकांना बंधुत्वाचा संदेश देण्यात आला आहे. "एका बौद्ध उपासकाने दुसऱ्या उपासकाशी शत्रुत्व न ठेवता मैत्रीभावाने वागावे," असे आवाहन मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी केले आहे.
मिशनच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की ;
“एका बौद्ध उपासकाने दुसऱ्या उपासकावर टीका, टिप्पणी किंवा विरोध करू नये. मतभिन्नता असली तरी शत्रुत्व नको. संवाद, सहकार्य आणि ऐक्य या भावनांतून समाज उभा राहिला पाहिजे.”
सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक बाबतीत सर्व बौद्ध उपासकांनी एकमत ठेवून समाजहित जोपासावे, असे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील बौद्ध उपासकांवर देशातील बहुजन समाजाला एकत्र आणण्याची जबाबदारी असल्याचे दीपक कदम यांनी स्पष्ट केले.
“महाराष्ट्रातील बौद्ध समाजाने एकसंघ राहून संघटित झाल्यास ते केवळ समाजहितासाठी नव्हे तर देशहितासाठीही मोठे योगदान ठरेल,” असे कदम म्हणाले.
मिशनने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये मतभिन्नता असूनही संवाद कायम ठेवावा, शत्रुत्व निर्माण होऊ न देता बंधुत्व टिकवावे आणि योग्य तात्त्विक कर्मामागे समाज उभा राहावा, असा संदेश देण्यात आला आहे.
या उपक्रमामुळे बौद्ध समाजात सामाजिक संवाद व ऐक्य वाढण्यास हातभार लागेल, असा विश्वास मिशनने व्यक्त केला आहे.
Post a Comment
0 Comments