छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशनतर्फे प्रदान करण्यात येणारा ‘महात्मा गांधी मराठवाडा भूषण सन्मान–२०२५’ यंदा साम्यवादी राजकीय नेते डॉ. भालचंद्र कांगो आणि ज्येष्ठ इतिहासकार डॉ. प्रभाकर देव यांना जाहीर करण्यात आला आहे. या प्रतिष्ठित सन्मान सोहळ्याचे आयोजन शुक्रवार, दि. ५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता रुक्मिणी सभागृह, महात्मा गांधी मिशन, सिडको, छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत व संपादक मा. कुमार केतकर उपस्थित राहणार असून, डॉ. पी. एम. जाधव (उपाध्यक्ष, महात्मा गांधी मिशन) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती नोंदवतील.
महात्मा गांधी मिशनचे अध्यक्ष मा. कमलकिशोर कदम तसेच एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांची प्रतिष्ठित उपस्थिती या सोहळ्याला विशेष अर्थ प्राप्त करून देणार आहे.
महात्मा गांधी मिशनचे सचिव व महात्मा गांधी मराठवाडा भूषण सन्मान निवड समितीचे अध्यक्ष अंकुशराव कदम यांनी नागरिकांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
या सन्मानामुळे सामाजिक, राजकीय व ऐतिहासिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या दोन महान व्यक्तींच्या कार्याचा गौरव पुन्हा एकदा उजाळा मिळणार आहे.
Tags
||महाराष्ट्र||
