नांदेड दि.२९ : नांदेड महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने आज झोन क्रमांक ६, सिडको येथे उमेदवारी अर्ज दाखल करत अधिकृतपणे निवडणूक रणशिंग फुंकले. प्रभाग क्रमांक १९ (अनुसूचित जाती) मधून पक्षाचे उमेदवार देवानंद गणपती सरोदे यांनी समर्थकांच्या उपस्थितीत नामनिर्देशन अर्ज दाखल केला. यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी व जयघोष करत उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले.
Tags
||जिल्हा||
