
नांदेड : महाविहार बावरीनगर, दाभड येथे पौष पौर्णिमेनिमित्त दहा दिवसीय भव्य श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून २३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता शिबिराचा शुभारंभ होणार आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराबाबत धम्मप्रिय बांधवांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.
तरुणांमध्ये धम्माची संस्कृती दृढ व्हावी, शिस्तबद्ध जीवन पद्धतीची जाण व आध्यात्मिक मूल्यांची रुजवात व्हावी, या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले. उपासक-उपासिका यांनी आपल्या मुलांना शिबिरात सहभागी होण्यासाठी प्रेरित करावे, असे आवाहन करण्यात आले.
शिबिरात पू. भिक्खू धम्मसेवक महाथेरो (मुळावा), पू. भिक्खू प्रा. डॉ. खेमधम्मो महाथेरो, पू. भिक्खू प्रा. डॉ. एम. सत्यपाल महाथेरो, पू. भिक्खू विनय बोधीप्रिय महाथेरो, पू. भिक्खू पय्यारत्न थेरो, पू. भिक्खू अस्सजी थेरो, पू. भिक्खू शीलरत्न थेरो, पू. भिक्खू संघपाल थेरो, पू. भिक्खू रेवतबोधी थेरो, पू. भिक्खू बुध्दभुषण, पू. भंते संघपाल, पू. भिक्खुनी चारुशिला थेरी यांच्यासह श्रामणेर व श्रामनेरी संघ मार्गदर्शन करणार आहेत.
•शिबिरातील नियम व अटी
शिबिरासाठी वयोगट १८ वर्षांवरील ठेवण्यात आला आहे. शिबिराच्या कालावधीत मोबाईल वापरावर बंदी राहणार आहे. सहभागी विद्यार्थ्यांनी वहीं, पेन, अंथरूण-पांघरूण, वैयक्तिक उपयोगाच्या वस्तू, आवश्यक औषधे सोबत आणणे आवश्यक आहे.
दाढी-मुंडन, नखे काढणे तसेच करदोडा, मंगळसूत्र, ताईत, दोरे इ. वस्तू घरीच ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. श्रामणेर संघास नास्ता, फराळ किंवा भोजन देऊ इच्छिणाऱ्या उपासकांनी विहारात पूर्वनोंद करणे आवश्यक आहे.
शिबिरातील सर्व नियम व धम्मविनयाचे पालन अनिवार्य असेल, असे आयोजकांनी स्पष्ट केले.
संपर्क :आयोजक : डॉ. एस. पी. गायकवाड – 8605890637
संपर्क : पू. भिक्खू बुद्धभुषण – 8605890637
Tags
||जिल्हा||