भीमा कोरेगाव गौरव गाथा अभियानांतर्गत भैय्यासाहेब आंबेडकर जयंती सोहळा; मान्यवरांची उपस्थिती


नांदेड :
 सामाजिक परिवर्तनाच्या विचारांना नव्याने उजाळा देत भीमा कोरेगाव गौरव गाथा अभियानांतर्गत सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर जयंती सोहळ्याचे आयोजन शुक्रवार, 12 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजता बाबूराव निलंगेकर विद्या संकुल, लालवाडी येथे करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठाचे अॅड. यशवंत मोरे उपस्थित राहणार आहेत, तर मार्गदर्शक म्हणून आंबेडकरी विचारधारेचे मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, लेखक व विविध पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत.

मार्गदर्शकामध्ये माजी नगरसेवक मंगेश कदमआंबेडकरी विचारवंत डॉ. प्रल्हाद इंगोलेप्रा. गौतम धुतडेप्रा. बाबाराव नरवाडेजेष्ठ पत्रकार अशोक काकांडीकरडॉ. अनंत सूर्यवंशी (फिनिक्स हॉस्पिटल)नाट्य दिग्दर्शक डॉ. विलास भद्रेवंचित बहुजन आघाडीचे रामचंद्र वनजेयशवंत थोरात,भीमयोद्धा शाम निलंगेकर तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संजय राक्षसे यांचासह अनेकांचा सहभाग राहणार आहे.

याशिवाय कामगार चळवळीतील गणेश शिंगे, रिपब्लिकन सेनेचे भारत भालेराव, सामाजिक क्षेत्राशी निगडीत अशोक गोडबोलेमाधव जमधाडे, न्यायालयीन क्षेत्रातील अॅड. नितीन थोरात आणि सदाशिव गच्चे (लॉर्ड बुद्धा) हेही मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील या विविध प्रतिनिधींमुळे कार्यक्रमाचे व्यापक स्वरूप अधिक ठळकपणे दिसून येत आहे.

या कार्यक्रमाचे संयोजन दीपक पवळे, प्रकाश वाघमारे, सम्यक खोसले, प्रकाश गजभारे, रोहन कहाळेकर, सुमेद सूर्यवंशी, आनंदा गजभारे, भुषण वाघमारे, कृष्णा वाघमारे व ऋषिकेश निलंगेकर या युवा टीमने केले आहे. तरुणांच्या पुढाकारामुळे कार्यक्रमात उत्साहाचे नवे वातावरण निर्माण झाले आहे.

भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित हा सोहळा समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांना पुनःप्रचिती देणारा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.



Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp