महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील ज्येष्ठ मराठी प्राध्यापक प्रा. संजय दशरथ जाधव यांचे दुःखद निधन


महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील ज्येष्ठ मराठी प्राध्यापक प्रा. संजय दशरथ जाधव यांचे दुःखद निधन


किनवट : महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून दीर्घकाळ सेवा बजावलेले, सेवानिवृत्त प्रा. संजय दशरथ जाधव  यांचे दि. १२ डिसेंबर २०२५ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात असून शिक्षक, विद्यार्थी आणि सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

प्रा. जाधव  हे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण करणारे, अभ्यासपूर्ण अध्यापन आणि शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांनी अनेक पिढ्यांना मराठी साहित्य, संस्कृती व मूल्यांची ओळख करून दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले असंख्य विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत.

त्यांचा अंत्यविधी दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी त्यांच्या राहत्या गावी मलकापूर (खेरडा) येथे शोकाकुल  वातावरणात पार पडला आहे.
प्रा. संजय जाधव  यांच्या निधनाने शिक्षणक्षेत्राने एक कर्तव्यदक्ष, आदर्श आणि संवेदनशील शिक्षक गमावला आहे. 

त्यांच्या पश्चात पत्नी,  एक मुलगा, चार मुली, जावई, भाऊ असा मोठा परिवार आहे .

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp