अजय कदम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मूकबधिर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप


किनवट :
येथील निवासी मूकबधिर विद्यालयात आज (ता. १३) विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबविण्यात आला. युवासेना तालुकाप्रमुख अजय कदम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयातील मूकबधिर विद्यार्थ्यांना वही, पेन तसेच खाऊचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. शैक्षणिक साहित्यामुळे त्यांच्या दैनंदिन अभ्यासाला मदत होणार असून, सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श यानिमित्ताने ठेवण्यात आला.

यावेळी विद्यालयातील शिक्षक, कर्मचारी तसेच युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनीच अजय कदम पाटील यांच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. अशा उपक्रमांतून समाजातील विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना आधार व प्रोत्साहन मिळते, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp