मुंबई : सरकारी आरोग्य सेवांचे खासगीकरण व कंत्राटीकरण वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दर्जेदार व मोफत आरोग्य सेवा मिळावी, या मागणीसाठी महाराष्ट्र कामगार कर्मचारी संयुक्त कृती समिती व जन आरोग्य अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने २८ डिसेंबर रोजी राज्यव्यापी आरोग्य अधिकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
करी रोड स्टेशनजवळील ना. म. जोशी मार्गावरील बाळ दंडवते स्मृतीस्थळ – म्युनिसिपल मजदूर युनियन सभागृहात सकाळी १० ते दुपारी ५ या वेळेत परिषद पार पडणार असून “सरकारी आरोग्यसेवांचे खासगीकरण थांबवा, कंत्राटीकरण बंद करा, सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेची हमी द्या” अशी प्रमुख मागणी परिषदेतून मांडली जाणार आहे.
या परिषदेत राज्यभरातून आरोग्य क्षेत्रातील विविध संघटना, कर्मचारी प्रतिनिधी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, धोरणात्मक चर्चा, अनुभव विनिमय व पुढील लढ्याची दिशा निश्चित केली जाणार आहे.
“28th Dec – चलो मुंबई!” या हाकेसह सर्वांना परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
Tags
||महाराष्ट||
