किनवटमध्ये ८० टक्के मतदान; तृतीयपंथीयांचा उत्स्फूर्त सहभाग.

 किनवट : किनवट नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत मंगळवार, दि. २ डिसेंबर रोजी सकाळी मंदावलेली मतदानाची गती सायंकाळपर्यंत वाढत गेली. अखेर अंदाजे ८० टक्के मतदान झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा, नयाकॅम्प येथे तृतीयपंथी मतदार शिवन्या राजू कोटलवार यांनी मतदान करून लोकशाही प्रक्रियेत मोलाचा सहभाग नोंदविला. तसेच प्रभाग १० मध्ये तृतीयपंथी शेख हसिना व शेख जयश्री यांनीही मतदानाचा हक्क बजावला. मात्र, दिव्यांगांसाठी आवश्यक सुविधा अपुऱ्या असल्याची खंत मतदारांनी व्यक्त केली.

चौख बंदोबस्त; पोलिसांची तत्परता कामी

संपूर्ण शहरात कडक सुरक्षा ठेवण्यासाठी पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य पोलीस दलाची अतिरिक्त तुकडी तैनात करण्यात आली होती. काही मतदान केंद्रांवर दुपारी तणाव निर्माण झाला असला, तरी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्या नेतृत्वाखाली १० पोलीस उपनिरीक्षक, १५० पोलीस कर्मचारी, १०० होमगार्ड, आरसीबी व एसआरपीएफचे प्लाटून तैनात असल्याने सर्व २९ केंद्रांवर मतदान शांततेत पार पडले.

प्रशासनाचे नियोजन प्रभावी

निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर, मुख्याधिकारी व सहायक


निवडणूक निर्णय अधिकारी विवेक कांदे, स्वीप नोडल अधिकारी अनिलकुमार महामुने, मीडिया नोडल अधिकारी उत्तम कानिंदे यांच्यासह संपूर्ण टीमने काटेकोर नियोजन केले.

जनप्रतिनिधी व उमेदवारांचा सहभाग

आमदार भीमराव केराम यांनी पत्नीसमवेत मतदान केले. तर माजी नगराध्यक्ष व भाजप उमेदवार पुष्पाताई मच्छेवार, महाविकास आघाडीच्या उमेदवार सुजाता एंड्रलवारकरण एंड्रलवार, माजी नगराध्यक्ष के. मूर्ती, माजी उपाध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार, ॲड. मिलिंद सर्पे, तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सूर्यकांता सर्पे यांनीही मतदान केला.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp