किनवट नगर परिषद निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान; अध्यक्षपदासाठी ८ तर सदस्यपदासाठी ९० उमेदवारांचे भविष्य EVM मध्ये बंद

 कि



नवट : नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता मंगळवारी (दि. २) घेतलेल्या मतदानाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. शहरातील २९ मतदान केंद्रावर शांततेत आणि सुरळीत मतदान पार पडले. अध्यक्षपदासाठी ८ तर, सदस्यपदासाठी ९० उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे.

नगर परिषदेच्या १९ प्रभागांत एकूण २५,५९३ मतदार असून यात पुरुष १२,३३४, स्त्री १३,२५६ आणि तृतीयपंथी ३ मतदारांचा समावेश आहे. सकाळी ६.३० वाजता मॉकपोल घेण्यात आला. प्रत्यक्ष मतदान 7?७.३० वाजता सुरू झाले. काही केंद्रांवर मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड झाल्याने राखीव यंत्रांचा वापर करून प्रक्रिया सुरळीत ठेवण्यात आली.

मतदानाचा टप्प्याटप्प्याने होत गेलेला प्रतिसाद असा —

  • सकाळी ७.३० ते ९.३० : ५.६१1%
  • सकाळी ७.३० ते;११.३० : १५.५१%
  • सकाळी ७.३० ते दुपारी १.३० : २९.१८%
  • सकाळी ७.३० ते दुपारी ३.३० : ४६.२१%

सायंकाळी पाचनंतर तीन मतदान केंद्रावर मतदारांची मोठी रांग असल्याने अंतिम मतदान टक्केवारी जाहीर करण्यात विलंब होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. सकाळी धीम्या गतीने मतदान सुरू झाले असले तरी दुपारनंतर केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा दिसून आल्या.

तहसीलदार व निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी व सहायक निर्णय अधिकारी विवेक कांदे तसेच नायब तहसीलदारांची टीम, मास्टर ट्रेनर्स व सर्व अधिकारी-कर्मचारी सकाळी ५.३० पासून कार्यरत राहिल्याने संपूर्ण प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पूर्ण करण्यात आली.

उपविभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गणेश कराड यांच्या नेतृत्वात चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याने मतदान केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

तृतीयपंथी मतदाराचे मतदान केंद्रावर आगमन

मतदान जनजागृती (स्वीप) उपक्रमाच्या आवाहनाला प्रतिसाद देत तृतीयपंथी मतदार शिवन्या राजू कोटलवार यांनी नांदेडहून येऊन नयाकॅम्प येथील जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा मतदान केंद्रावर हक्काचा मतदानाचा उपयोग केला. यावेळी डॉ. शारदा चौंडेकर, सहायक निर्णय अधिकारी विवेक कांदे, गटशिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने, मीडिया कक्षाचे नोडल अधिकारी उत्तम कानिंदे, मास्टर ट्रेनर्स व अन्य अधिकारी उपस्थित होते.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp