पर्यावरण संरक्षणावर कायदेविषयक मार्गदर्शन किनवट न्यायालयात तालुका विधी सेवा समितीच्यावतीने शिबिर


किनवट,दि.३१ : तालुका विधी सेवा समिती व वकील संघाच्या वतीने न्यायालयाच्या प्रांगणात पर्यावरण संरक्षण कायद्याविषयी मोफत कायदेविषयक शिबिराचे आयोजन आज(दि.३१)करण्यात आले. पर्यावरण संवर्धन, प्रदूषण नियंत्रण व पर्यावरणीय कायद्यांविषयी जनतेत जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हे शिबिर घेण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सह दिवाणी व फौजदारी न्यायाधीश के.जी. मेंढे हे होते.अध्यक्षिय समारोप  करताना त्यांनी  पर्यावरण रक्षणासाठी कायद्यांची भूमिका व नागरिकांची जबाबदारी यावर प्रकाश टाकला. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष ॲड किशोर मुनेश्वर हे उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना प्रमुख वक्ते ॲड. पंडित घुले यांनी पर्यावरण संरक्षण कायद्यांचे स्वरूप, अंमलबजावणी तसेच पर्यावरणीय गुन्ह्यांवर होणाऱ्या कारवाईविषयी सविस्तर माहिती दिली. शिबिराचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन ॲड. सचिन दारवंडे यांनी केले.
शिबिरास न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार, ज्येष्ठ-कनिष्ठ वकील व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाद्वारे पर्यावरण जपण्याचा संदेश देत कायदेशीर माहिती जनतेपर्यंत पोहोचवली.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp