'राज्यराणी' एक्स्प्रेसचा आदिलाबादपर्यंत विस्तार करावा – रेल्वे संघर्ष समितीची मागणी


किनवट, दि.१  : नांदेड ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या ‘राज्यराणी’ एक्स्प्रेस तसेच ‘तपोवन’ रेल्वेगाडीचा विस्तार आदिलाबादपर्यंत करण्याची मागणी रेल्वे संघर्ष समितीचे सचिव उद्धव रामतिर्थकर यांनी केली आहे.

  सध्या नांदेडहून मुंबईकडे ‘राज्यराणी’ एक्स्प्रेस रात्री १० वाजता सुटते. जर या गाडीचा मार्ग वाढवून ती आदिलाबादपर्यंत नेण्यात आली, तर आदिलाबाद, किनवट परिसरासह पुढील स्थानकांवरील मुंबई प्रवाशांना मोठा लाभ होईल, असे रामतिर्थकर यांनी सांगितले.
काझीपेठ–मुंबई साप्ताहिक गाडी अद्यापही बंद आहे. ती पूर्ववत सुरू केल्यासही प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असेही त्यांनी नमूद केले. रेल्वे मार्गावरील प्रलंबित कामांकडे दक्षिण मध्य रेल्वेने लक्ष द्यावे व हा विषय आदिलाबाद आणि हिंगोलीतील खासदारांनी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षमूलक मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
रेल्वे विभागाने सकारात्मक दखल घेतल्यास या मार्गावरील रेल्वेप्रवास अधिक सोयीस्कर व सुकर होईल, असा विश्वास रामतिर्थकर यांनी व्यक्त केला.
Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp