किनवट नगरपरिषदेत मुस्लिम व वेलमा समाजाचा प्रभाव कायम; वेलमा समाजाचा ऐतिहासिक विजय

नगराध्यक्षा- सुजाता विनोद एंड्रलवार 

किनवट, ता.२१ : किनवट नगर परिषदेच्या स्थापनेपासूनच शहराच्या राजकारणावर मुस्लिम व वेलमा या दोन समाजांचा प्रभाव राहिला आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने मुस्लिम समाज बहुसंख्य असून, वेलमा समाज हा अत्यल्प आहे .अत्यअल्प असूनही  नगरपरिषदेच्या राजकारणात वेलमा समाजाचा प्रभाव नेहमीच लक्षणीय राहिला आहे.



नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीत मुस्लिम समाजाचे सात नगरसेवक विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे अत्यल्प लोकसंख्या असलेल्या वेलमा समाजाचे सहा नगरसेवक तसेच नगराध्यक्ष निवडून येत या समाजाने ऐतिहासिक यश संपादन केले आहे. वेलमा समाज प्रामुख्याने तेलंगणा व आंध्र प्रदेशातील असून, महाराष्ट्रात हा समाज केवळ किनवट व पांढरकवडा या दोन तालुक्यांत आढळतो.
वेलमा समाजातून निवडून आलेले नगरसेवक पुढीलप्रमाणे—
प्रिती धिरज नेम्मानीवार
श्रीराम नेम्मानीवार
शेखर रंगराव नेम्मानीवार
निकिता स्वागत अयनेनवार
श्रीनिवास किसनराव नेम्मानीवार
सूरज व्यंकटराव सातूरवार
अत्यल्प लोकसंख्या असूनही संघटित राजकारण, प्रभावी नेतृत्व आणि मतदारांचा विश्वास यामुळे वेलमा समाजाने नगरपरिषदेत भक्कम उपस्थिती नोंदवली आहे. या निकालामुळे किनवटच्या राजकारणात सामाजिक समतोलासोबतच प्रतिनिधित्वाची नवी दिशा मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.



Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp