भारतीय स्त्री मुक्ती दिनानिमित्त आंबेडकरी स्त्री संघटनाचा विचारप्रवण कार्यक्रम


मुंबई : भारतीय स्त्री मुक्ती दिनाचे औचित्य साधून आंबेडकरी स्त्री संघटन यांच्या वतीने गुरुवार, २५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ ते ८ या वेळेत मुंबईत विचारप्रवण व प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय येथील सुरेंद्र गावस्कर सभागृह, दादर (पूर्व) येथे संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. विमल थोरात (साहित्यिका व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या) भूषविणार असून प्रमुख वक्ते म्हणून सुरेश सावंत (लेखक, संविधान प्रचारक व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते) उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या निमंत्रक म्हणून प्रा. आशालता कांबळे (आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्या, लेखिका, कवयित्री व समीक्षक) कार्यरत आहेत.
कार्यक्रमाचे सशक्त आयोजन सुकाणू कमिटीच्या मार्गदर्शनाखाली होत असून त्यामध्ये प्रा. डॉ. प्रज्ञा दया पवार, प्रा. डॉ. श्यामल गरुड, शिरीन लोखंडे, पुष्पा धाकतोडे, नंदा कांबळे, शारदा नवले, छाया खोब्रागडे, छाया कोरेगावकर, प्रा. डॉ. निशा शेंडे, माधुरी शिंदे, सुरेखा पैठणे, वैभवी अडसूळ आणि मयुरा सावी यांचा समावेश आहे.
भारतीय स्त्री मुक्ती दिनाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर स्त्रीस्वातंत्र्य, संविधानिक मूल्ये, सामाजिक न्याय आणि समतेच्या लढ्याचा आंबेडकरी दृष्टिकोन या विषयांवर चिंतन-मंथन घडवून आणणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. महिला, विद्यार्थी, अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp