संविधान मूल्यांचे संवर्धन व प्रतिष्ठेसाठी प्रगतिशील साहित्य संमेलन


छत्रपती संभाजीनगर : संविधानातील मूल्यांचे संवर्धन, लोकशाहीची जपणूक आणि सामाजिक समतेचा विचार साहित्याच्या माध्यमातून अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने शनिवार, दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी प्रगतिशील साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन विवेकानंद महाविद्यालय, समर्थनगर येथे सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० या वेळेत होणार आहे.

या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कथाकार व कादंबरीकार उत्तम बावस्कर लाभले आहेत. उद्घाटन प्रसिद्ध कवी व गीतकार प्रशांत मोरे (मुंबई) यांच्या हस्ते होणार आहे. तसेच, माजी संमेलनाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक व अनुवादक मिर्झा अस्लम यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून श्रीमंतराव शिसोदे (सहसचिव, विवेकानंद शिक्षण संस्था) काम पाहणार आहेत.
या साहित्य संमेलनात संविधानिक मूल्ये, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सामाजिक न्याय आणि प्रगतिशील विचारधारांचे सशक्त प्रतिबिंब उमटणार असून, विचारवंत, साहित्यिक, विद्यार्थी व वाचकांसाठी ही एक प्रेरणादायी मेजवानी ठरणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.


Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp