नया अकोला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य अभिवादन यात्रा व श्रद्धांजली सभा


 अकोला  : प्रज्ञासुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा ग्रामीण व शहर काँग्रेस कमिटीतर्फे अभिवादन यात्रा आणि अभिवादन सभेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार, दि. ६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (इर्विन) येथून अभिवादन यात्रेला सुरुवात होणार असून ती अस्थी स्मारक “श्रद्धाभूमी”, नया अकोला येथे समाप्त होईल.

यात्रेनंतर सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद शाळा प्रांगण, नया अकोला येथे अभिवादन सभा आयोजित आहे.

या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून मा. खा. मुकुलजी वासनिक (राज्यसभा खासदार) आणि मा. खा. प्रणितीताई शिंदे (खासदार, सोलापूर लोकसभा) उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून मा. खा. बळवंतभाऊ वानखडे व माजी मंत्री मा. अॅड. यशोमतीताई ठाकुर आपला मनोगत व्यक्त करणार आहेत.

प्रबोधनात्मक अभिवादनाचे व धार्मिक संदेशाचे वाणीतून सादरीकरण संदीपपाल महाराज करणार असून कार्यक्रमात सप्त खंजरी किर्तन यांचेही आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमाचे विनित
सौ. जिलेश्वरीताई डॉ. शंकरराव ठाकरे,
सरपंच, ग्रा.पं. डिगरगव्हाण व जिल्हा परिषद नांदगाव पेठ सर्कल
यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

नया अकोला परिसरात या अभिवादन यात्रेस व सभेला मोठ्या प्रमाणात अनुयायी व नागरिक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp