ग्राहक संरक्षणाला नवे बळ; मारोती सुंकलवाड नांदेड जिल्हाध्यक्ष

 किनवट, दि.३ : धडाडीचे शिवसैनिक, माजी पंचायत समिती सभापती आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या ‘दिशा’ समितीचे अशासकीय सदस्य मारोती सुंकलवाड यांची लोककल्याण ग्राहक संस्थेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात ग्राहक हक्क संरक्षणाचे उपक्रम अधिक जोमाने राबवले जातील, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

या नियुक्तीचे अधिकृत पत्र गोदावरी अर्बनच्या मुख्य कार्यालयात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात सुंकलवाड यांना प्रदान करण्यात आले. राष्ट्रीय अध्यक्ष दिनकर आमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तथा राज्याचे मंत्री आणि विधान परिषद आमदार हेमंत पाटील यांच्या हस्ते नियुक्तिपत्र सुपूर्द करण्यात आले.

कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, शिवसैनिक, तसेच आमदार हेमंत पाटील यांचे संपर्क अधिकारी सुनील गरड पाटील आणि योगेश जायभाये यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यकर्तृत्व सिद्ध केलेल्या सुंकलवाड यांनी ग्राहकांच्या हक्कांविषयी जनजागृती वाढवणे, फसवणूक रोखणे आणि तक्रार निवारणासाठी सक्षम यंत्रणा उभारणे हे आपले प्रमुख ध्येय असल्याचे सांगितले. सुंकलवाड यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील ग्राहक संरक्षण चळवळीला नवी दिशा आणि बळ मिळेल, असा विश्वास राष्ट्रीय अध्यक्ष आमकर यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यातील विविध राजकीय व सामाजिक वर्तुळातून सुंकलवाड यांचे अभिनंदन होत आहे.





Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp