नागपूर : राष्ट्रीय बौद्ध महासभेतर्फे येत्या १ जानेवारी रोजी पुण्यातील भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला शौर्य दिनाच्या निमित्त अभिवादन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ३ जानेवारी २०२६ रोजी भारतातील प्रथम महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, मंगळवार पेठ, पुणे येथे विविध कार्यक्रमांनी साजरी होणार आहे.
या कार्यक्रमांना राष्ट्रीय बौद्ध महासभेचे संस्थापक धर्मप्रकाश भारतीय बौद्ध, माजी आमदार व संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष इंजि. किशोर बौद्ध, राष्ट्रीय आचार्य डॉ. राजाराम आनंद (अलिगड), राष्ट्रीय समन्वयक डी. पी. गोलिया (भोपाळ), मुंबई समन्वयक इंजि. शेषराव घांगळे, नागपूरचे इंजि. शुद्धोधन बडवणे, धम्म संस्कार समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष इंजि. रमेश बनगोत्रा (जम्मू), राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. आनंद भालेराव, राज्य संघटन सचिव नंदा फुकट, माजी खासदार सुधीर सावंत, माजी सैनिक शामराव भोसले (महार रेजिमेंट), महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. चांगदेव शेंडे व महाराष्ट्र प्रभारी ईश्वर कडवे यांच्यासह देशभरातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
विजयस्तंभ शौर्य, समता आणि सामाजिक न्यायाचे प्रतीक असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरही १ जानेवारी रोजी येथे उपस्थित राहून अभिवादन करीत असत. त्या स्मृतींना उजाळा देत यंदाही देशभरातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. तसेच सावित्रीबाई फुले यांच्या कार्यभूमीत त्यांची जयंती साजरी करून सामाजिक परिवर्तनाच्या आंदोलनातील त्यांच्या मोठ्या योगदानास अभिवादन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशभरातील अनुयायांनी पुणे येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रीय बौद्ध महासभेतर्फे करण्यात आले आहे.
Tags
||महाराष्ट||
