‘सन्मानपूर्वक जीवनाचा हक्क’ विषयावर नांदेडमध्ये विचारमंथन; MPJ तर्फे टेबल टॉकचे आयोजन

नांदेड, ता. २६ (बातमीदार) : मानवी सन्मान, न्याय, समानता आणि शांततापूर्ण सहअस्तित्व या मूलभूत मूल्यांवर समाजात व्यापक चर्चा घडवून आणण्याच्या उद्देशाने मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस (MPJ) नांदेड यांच्या वतीने “सन्मानपूर्वक जीवनाचा हक्क (Right to Life with Dignity)” या विषयावर टेबल टॉकचे आयोजन करण्यात आले आहे.

या विचारमंथनात्मक कार्यक्रमाला मोहम्मद सिराज (मुंबई), राज्याध्यक्ष, MPJ महाराष्ट्र हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम शुक्रवार, दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आला असून, स्थळ हॉटेल अतिथी, दुसरा मजला, शिवाजी नगर, नांदेड असे आहे.
सदर टेबल टॉकमध्ये मानवी हक्कांचे संरक्षण, सन्मानपूर्वक जीवनाची संकल्पना, सामाजिक न्याय, समानतेचे मूल्य आणि शांततापूर्ण सहअस्तित्व या विषयांवर सखोल व संवादात्मक चर्चा होणार आहे. विविध सामाजिक घटक, विचारवंत, कार्यकर्ते व संवेदनशील नागरिक यांची उपस्थिती या चर्चेला नवी दिशा देईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विचारमंथनात सहभागी व्हावे, असे आवाहन एस. एम. समीम, जिलाध्यक्ष, MPJ नांदेड यांनी केले आहे.


Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp