भिमा कोरेगाव शौर्य दिन महोत्सवाला किनवटमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद ५०० महार शूरवीरांना अभिवादन करत अन्नदान, साहित्य वाटप, भव्य सोहळ्यातून मानवंदना


किनवट, दि.१ : रमामाता प्रतिष्ठाण-किनवटच्या वतीने २०८ वा भिमा कोरेगाव शौर्य दिन महोत्सव भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ येथे आज( दि.१) उत्साहात साजरा करण्यात आला. मानवंदना कार्यक्रमाला आंबेडकरी विचारांच्या नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११ वाजता समता सैनिक दलाकडून विजयी स्तंभाला सलामी देऊन करण्यात आली. त्यानंतर ११ वाजता  अन्नदानाचे  वाटप करण्यात आले.
  यावेळी सामाजिक बांधिलकी जोपासत गरजू नागरिकांना ब्लँकेट, लहान मुलांना शालेय साहित्य तसेच विद्यार्थ्यांना भिमा कोरेगाव शौर्य लढाईवरील पुस्तके वाटप करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष अभि. प्रशांत ठमके,तालुका अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा हे होते.यावेळी सुजाता विनोद एंड्रलवार, नगराध्यक्ष, न.प. किनवट,नगरसेविका ललिता मुनेश्वर यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉक्टर्स, वकील, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच अनेक युवकांचा उत्स्फूर्त सहभाग यावेळी राहिला.
कार्यक्रमाचे संयोजन शरण लोखंडे (अध्यक्ष), सचिन हाटकर (उपाध्यक्ष), संघर्ष घुले (सचिव), प्रतिकेश ओंकार (कोषाध्यक्ष) व त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखणे नियोजन करून हा कार्यक्रम  व्यवस्थित  पार पाडला.
या भव्य मानवंदना सोहळ्यात सर्व आंबेडकरी बांधवांनी परंपरेप्रमाणे भिमा कोरेगावच्या ५०० महार शूरवीरांना नतमस्तक अभिवादन केले.
Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp