अंधश्रद्धा निर्मूलनासाठी नवे संकल्प : अंनिस राज्य कार्यकारिणीची बैठक किनवटमध्ये



किनवट, दि.१ (बातमीदार): महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) ची राज्य कार्यकारिणी बैठक दिनांक ३ व ४ जानेवारी रोजी किनवट तालुक्यातील एमआयडीसी, कोठारी येथील साने गुरुजी इमर्जन्सी व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत राज्यातील १०० हून अधिक वरिष्ठ पदाधिकारी, प्रतिनिधी व शाखा पदाधिकारी सहभागी होणार आहेत. यामुळे किनवटमध्ये या बैठकीबाबत उत्सुकता वाढली आहे.

   बैठकीचे अध्यक्षस्थान अंनिसचे राज्य अध्यक्ष माधव बावगे हे भूषवणार असून दोन दिवसीय बैठकीत आगामी वर्षात राबविण्यात येणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन मोहिमा, विज्ञानाधारित विचार व विवेकनिष्ठ चळवळीचे बळकटीकरण, जनजागृती कार्यक्रम, प्रशिक्षण शिबिरे तसेच संघटन विस्तारावर चर्चा होणार आहे. कार्ययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी विविध समित्याही गठित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अंनिसचे राज्य उपाध्यक्ष डॉ. अशोक बेलखोडे, किनवट शाखाध्यक्ष प्रा. उमाकांत इंगोले आणि शाखा कार्यवाह प्रा. डॉ. पंजाब शेरे यांनी दिली.


या बैठकीस महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, राज्य प्रधान सचिव डॉ. ठाकसेन गोराने, विनायक सावळे, रुकसाना मुल्ला, विजय परब, राज्य सरचिटणीस कृष्णात स्वाती, सुधाकर काशीद, आरती नाईक, सुरेश बोरसे, शहाजी भोसले, उत्तरेश्वर बिराजदार, विलास निंभोरकर, राज्य कार्यवाह प्राचार्य डॉ. सविता शेटे, डॉ. बालाजी कोम्पलवार, प्रा. परेश शहा, ऍड. मनीषा महाजन, अनिल दरेकर, अनिल करवीर, 'अंनिप'चे संपादक डॉ. नितीन शिंदे, कार्यकारी संपादक उत्तम जोगदंड, व्यवस्थापकीय संपादक अजय भालकर, डॉ. बाळू दुगदडुमवार, तसेच विविध जिल्ह्याचे कार्याध्यक्ष, जिल्हा प्रधान सचिव, आणि राज्यस्तरीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
राज्यस्तरीय नेतृत्वाच्या उपस्थितीत विज्ञानवादावर आधारित सामाजिक परिवर्तनाची दिशा ठरविण्याचा प्रयत्न या बैठकीतून होणार असून, ग्रामीण ते शहरी पातळीपर्यंत अंधश्रद्धा निर्मूलन मोहिमा अधिक प्रभावी करण्याचे धोरण आखले जाईल. किनवटमध्ये या बैठकीमुळे चळवळीतील कार्यकर्त्यांना प्रेरणा व नवी ऊर्जा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp