थारा येथे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेची शाखा स्थापन


किनवट, दि. २५ : मका पिकाचा प्रमुख पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थारा गावात शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेची नवी शाखा नुकतीच स्थापन करण्यात आली. हनुमान मंदिरात पार पडलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रामराव जमादार होते.

    मागील हंगामात मका अवघ्या १४०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकावी लागल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शासनाने जाहीर केलेला हमीभाव केवळ कागदावरच राहिला असून प्रत्यक्षात शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही. तसेच, वेळेवर सोयाबीन खरेदी केंद्र सुरू न झाल्याने व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर फायदा उचलल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
या भागात अमाप आर्थिक व्यवहार करून काही व्यापाऱ्यांनी खरेदी केंद्र मिळवले असून, शासनाने खरेदी केलेला शेतमाल शेतकऱ्यांच्या नावावर दाखवून दलाल व व्यापाऱ्यांनी शासन आणि शेतकरी दोघांचीही फसवणूक केल्याचा आरोप उपस्थित करण्यात आला.
     गाव पातळीवरच मका खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी शेतकरी आता संघटित झाले असून या मागणीचा शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येईल. गरज भासल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही जिल्हाध्यक्ष रमेश कदम पाटील यांनी दिला.
      यावेळी शाखेच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी विजय बोईनवाड, उपाध्यक्ष बलराज बसी, सचिव बळीराम मिरासे, सहसचिव गुणवंत पवळे, कोषाध्यक्ष गोविंद पडवाळे, सल्लागार पुंडलिक जटाळे व व्यवस्थापक सुंदरसिंग साबळे यांची निवड करण्यात आली.
कार्यकारिणी सदस्य म्हणून शिवचरण धिरबसी, निरंजन पवार, सुनील साबळे, सुभाष साबळे, प्रवीण मिरासे, महादू खोकले, चंद्रसिंग दातळे, संदीप आंबिलवाड, माधव खोकले, रमेश राकटे, गोविंद खंदारे, संदीप देशमुखे, रामजी टारपे, अजय साबळे, ईश्वर साबळे, वीरेंद्र धिरबसी, गुरुदेव दातळे, परसराम देशमुखे, दिनेश साबळे, भानुदास डोळे, संतोष जाटवे, मुक्तेश्वर साबळे, अंकुश साबळे, दादाराव पवळे, बालाजी पवळे, उत्तम येटेवाड, आनंदा येलेबोईनवाड, रवी बोईनवाड, माधव बोईनवाड, संतोष भुरके, अविनाश राजलवाड, बालाजी खंदारे व हरी खंदारे यांचा समावेश आहे.
या बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून पंढरीनाथ वाघमारे, राजेश जमादार, गजानन चव्हाण, सखाराम भिसे यांच्यासह गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp