बाबा आमटे राष्ट्रीय पुरस्कार २०२६ : समाजपरिवर्तनासाठी झटणाऱ्यांचा गौरव

मुंबई : समाजसेवा, मानवाधिकार आणि सामाजिक प्रबोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करणारा बाबा आमटे राष्ट्रीय पुरस्कार समारंभ २०२६ येत्या सोमवार, ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.

    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक असणार असून, ज्येष्ठ संपादक, विचारवंत व माजी खासदार  कुमार केतकर तसेच प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्ते अ‍ॅड. असीम सरोदे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
     यंदाचा बाबा आमटे सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार  लातूर येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याध्यक्ष व भारत जोडो सायकल यात्रेचे प्रवर्तक माधव बावगे यांना जाहीर झाला आहे, तर बाबा आमटे जीवनगौरव राष्ट्रीय पुरस्कार २०२६ कोलकाता येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ओ. पी. शहा यांना प्रदान करण्यात येणार आहे.
    हा भव्य पुरस्कार सोहळा यशवंतराव चव्हाण केंद्रातील ‘ऋणानुबंध’ सभागृहात, मंत्रालयाजवळ आयोजित करण्यात आला असून, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, विचारवंत, नागरिक व मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बाबा आमटे एकता अभियान ट्रस्टच्या वतीने उपाध्यक्ष  डॉ.सोमनाथ रोडे व सचिव डॉ अशोक बेलखोडे यांनी केले आहे.


Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp