किनवट, ता.३: स्त्री शिक्षण, सामाजिक समता व सक्षमीकरणासाठी आयुष्य वेचणाऱ्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती आज(ता .३) किनवट शहरात उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.
जयंतीनिमित्त शहरातील फुले दांपत्याच्या पुतळ्याजवळ सकाळी ११ वाजता मुख्य अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, शिक्षक, महिला प्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी सावित्रीबाईंच्या स्त्री शिक्षणातील योगदानाचा गौरव करत, आजच्या काळातही त्यांच्या विचारांची आवश्यकता अधोरेखित केली.
स्त्री-पुरुष समानता, शिक्षणातून सामाजिक परिवर्तन आणि अन्यायाविरुद्ध लढ्याचा संदेश या निमित्ताने पुन्हा एकदा समाजात रुजविण्यात आला.
या कार्यक्रमामुळे परिसरात प्रेरणादायी व सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते.
Tags
||जिल्हा||
