किनवट: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने किनवट येथील जिजामाता चौकात शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष वैजनाथ करपुडे पाटील व तालुका अध्यक्ष बाळू पवार पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
शोकसभेचे सूत्रसंचालन वैजनाथ करपुडे पाटील यांनी केले. यावेळी आमदार भीमराव केराम यांनी आपल्या मनोगतातून अजितदादा पवार यांच्याशी असलेल्या तब्बल ३५ वर्षांच्या स्नेहसंबंधांना उजाळा दिला.
ते म्हणाले, “माझ्या पहिल्या आमदारकीच्या कार्यकाळात अजितदादा पवार यांचा सहवास लाभला. मोठ्या साहेबांसाठी त्यांनी लोकसभा सोडून विधानसभा लढवली, त्या काळात आम्ही सहकारी म्हणून एकत्र काम केले. प्रशासनावरची त्यांची पकड, नेतृत्वगुण आणि विकासाभिमुख, तडफदार कार्यशैली आजही स्मरणात कोरली आहे. ते केवळ आदेश देणारे नेते नव्हते, तर कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणारे खरे मार्गदर्शक होते.”
शोकसभेला अनेक मान्यवरांची उपस्थिती
या शोकसभेत भाजपा नेते सुधाकर भोयर, अशोक पाटील सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष इसा खान, पत्रकार प्रदीप वाकोडीकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमास माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद नांदेड प्रकाश गब्बा राठोड, ज्येष्ठ नेते नारायणराव सिडाम, माजी सभापती अनिल पाटील कऱ्हाळे, माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेम्मानिवार, आनंद मच्छेवार, के. मूर्ती, साजिद खान, जिल्हा सरचिटणीस प्रा. किशन मिरासे, ओबीसी नेते बाबूराव केंद्रे, मंडळ अध्यक्ष स्वागत आयनेनिवार, उमाकांत कऱ्हाळे पाटील, प्रा. विजय खुपसे, गटनेते जहीर खान, गिरीश नेम्मानिवार, इनायत भाटी, इम्रान शेख चांद, विनोद भरणे, रोहिदास जाधव, शब्बीर गौड, प्रा. आनंद भालेराव, अॅड. रायबोले, बालाजी धोत्रे, हौसाजी काकडे, मारोती सुंकलवाड, पत्रकार प्रमोद पोहरकर, कचरू जोशी, किरण ठाकरे, सतीश नेम्मानिवार, शेख खलील, चेतन मुंडे, बाळकृष्ण कदम, बबन वानखेडे, दगडू भरकड, सुभाष बाबू नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.शेवटी उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून दिवंगत नेत्यास श्रद्धांजली अर्पण केली.
Tags
||महाराष्ट||
