किनवट : शनिवारपेठ(ता.किनवट)केंद्रांतर्
शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा जिजाबाई श्रीहरी शेलार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी वसुंधरा संजय कदम हिने स्त्रीभ्रूणहत्या विषयावर आधारित ‘मला जगायचं…’ ही संवेदनशील एकपात्री सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
कार्यक्रमाची सुरुवात संगीत विशारद शिक्षिका अर्चना भंडारवार यांच्या स्वागतगीताने झाली. त्यानंतर गवळण नृत्य, देश रंगीला, ललाटी भंडार, जोगवा, माऊली-माऊली, शिवरायांवरील गीत, फुले-सावित्री, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित गीतांवरील नृत्ये, तसेच विविध रिमिक्स नृत्यप्रकार विद्यार्थ्यांनी सादर केले. या सादरीकरणांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रमेश मुनेश्वर यांनी केले. सूत्रसंचालन पदविधर शिक्षक प्रल्हाद गित्ते यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपक्रमशील शिक्षक मनोहर खोकले यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीहरी शेलार, संजय कदम, बंडू चव्हाण, देवराव हातमोडे, परमेश्वर कदम, उमाकांत शेलार, अरविंद कदम, ओमप्रकाश नरवाडे, जयवंत दिवठाणकर, गंगाधर मिरासे, अभिमन्यू चव्हाण, अंगणवाडी सेविका विद्या कावळे, अर्चना पिलवंड, पंचफुलाबाई पवार आदींसह शिक्षक व पालकांनी परिश्रम घेतले.
या सांस्कृतिक कार्यक्रमात शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
Tags
||जिल्हा||

