बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित कार्यक्रमात ते “बोलीभाषा व सद्यस्थिती” या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य तथा मराठी विभागप्रमुख डॉ. पंजाब शेरे होते. व्यासपीठावर प्रा. डॉ. सुरेंद्र शिंदे व प्रा. डॉ. प्रज्ञा घोडवाडीकर उपस्थित होते.
प्रा. डॉ. राठोड यांनी विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय वाढवून लेखनकौशल्य विकसित करावे, असे आवाहन केले. बोलीभाषेतून लिहिलेल्या ‘कल्लोळ’ या त्यांच्या आत्मकथनास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाल्याचा उल्लेख करत, बोलीभाषा जशी आहे तशी स्वीकारून तिचे संवर्धन करणे ही आजची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर बोलीभाषेतील शब्दांचे अर्थ शोधून नव्या साहित्यनिर्मितीस चालना देण्याचे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी किनवट परिसरातील बोलीभाषेवर प्रा. डॉ. प्रज्ञा घोडवाडीकर यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप डॉ. पंजाब शेरे यांनी केला.हा कार्यक्रम प्राचार्य डॉ. एस. के. बेंबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमास प्रा. शेषराव माने, प्रा. डॉ. आम्रपाली हटकर, डॉ. सुलोचना जाधव, डॉ. स्वाती कुरमे, प्रा. नागनाथ मुकाडे, प्रा. सतीश मिराशे आदी उपस्थित होते. तिन्ही शाखांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. दयानंद वाघमारे यांनी मानले.
•मिलिंद सर्पे, बातमीदार, किनवट,ता.२७/१/२०२६-12:55PM