मुंबई : बुद्ध विहार समन्वय समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्यस्तरीय कार्यकर्ता बैठक रविवार, दि. ११ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १ ते ४ या वेळेत सिद्धार्थ महाविद्यालय, बुद्ध भवन, सी. एस. टी. फोर्ट येथे उत्साहात आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत बुद्ध विहारांचे चौथे राष्ट्रीय अधिवेशन यशस्वीरीत्या आयोजित करण्यासाठी विचारविनिमय करण्यात येणार आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अशोक सरस्वती बौद्ध (राष्ट्रीय अध्यक्ष) राहणार असून अधिवेशनाचे दोन्ही स्वागताध्यक्ष आयु. सुरेशजी त्रिभुवन गुरुजी (मुंबई) व आयु. डॉ. चंद्रकांतजी साळवे (उल्हासनगर) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या राज्यस्तरीय बैठकीचे मुख्य संयोजक म्हणून महेंद्रजी बुद्धरत्न बारसागडे, मेहेराताई गायकवाड, स्मिताताई खैरनार, धरमदासजी डवले, सिद्धार्थजी साळवे, सदानंदजी जाधव, अशोकजी पंडागडे व दिगंबरजी हजारे काम पाहत आहेत. तसेच विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा विभागातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, शनिवार–रविवार दि. २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी उल्हासनगर–३ (पश्चिम), जि. ठाणे येथील जनरल अरुणकुमार वैद्य टाऊन हॉल येथे मुंबई विभाग–कोकण प्रदेशात चौथे राष्ट्रीय अधिवेशन घेण्याचे निश्चित झाले आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन वं. भिक्खू डॉ. उपगुप्त महास्थविर (राष्ट्रीय कार्याध्यक्ष, अखिल भारतीय भिक्खू संघ) यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून उद्घाटक म्हणून सुप्रसिद्ध विचारवंत, कामगार नेते व अ. भा. रिपब्लिकन पार्टी (सेक्युलर) अध्यक्ष आयु. शामदादा गायकवाड (अंबरनाथ) उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाचा समारोप अखिल भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. भीमरावजी यशवंतराव आंबेडकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.
या अनुषंगाने सविस्तर चर्चा व नियोजनासाठी सर्व जबाबदार कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रा. डॉ. आनंद भालेराव (केंद्रीय महासचिव) व ए. के. पाटील (कार्यालईन केंद्रीय सचिव) यांनी केले आहे.
Tags
||महाराष्ट||