दिव्यांगांच्या गुणविकासाचा उत्सव! नांदेडमध्ये जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा


किनवट : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग मुला-मुलींच्या अंगी असलेली क्रीडा व सांस्कृतिक गुणवत्ता उजागर करण्यासाठी जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात किनवट  व माहूर तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग  नोंदवावा, असे आवाहन नांदेड जिल्हा दिव्यांग सेक्युलर मुव्हमेंट चे अध्यक्ष ॲड.मिलिंद सर्पे व किनवट तालुका प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे अध्यक्ष भगवान मारपवार यांनी केले आहे.

    या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी, नांदेड हे भूषविणार असून उद्घाटन मेघना कावली, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड यांच्या हस्ते होणार आहे.कार्यक्रमास अबिनाश कुमार, पोलिस अधीक्षक, नांदेड, सतेंद्र आऊलवार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, महेश कुमार डोईफोडे, मनपा आयुक्त, यांच्यासह जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकारी व शिक्षणाधिकारी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
• असे असेल कार्यक्रमाचे स्वरूप
क्रीडा स्पर्धा
दिनांक : १९ जानेवारी २०२६
वेळ : सकाळी १०
स्थळ : सायन्स कॉलेज मैदान, नांदेड
सांस्कृतिक स्पर्धा
दिनांक : २० जानेवारी २०२६
वेळ : सकाळी १०
स्थळ : शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, नांदेड
या उपक्रमाचे आयोजन अवधुत व्यंकटराव गंजेवार, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे.
दिव्यांग मुला-मुलींमधील सुप्त कलागुणांना संधी देणारा हा उपक्रम त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मैलाचा दगड ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp