किनवटजवळ पहाटे भीषण अपघात; डॉक्टर बहीण-भाऊ व चालक गंभीर जखमी, नागपुरात उपचार सुरू


किनवट,ता.६ : चंद्रपूर ते किनवट या मार्गावर आज पहाटे सुमारे पाचच्या सुमारास घोटी(ता . किनवट)परिसरात झालेल्या भीषण अपघातात डॉक्टर बहीण-भाऊ आणि वाहनचालक असे तिघेजण गंभीर जखमी झाले. सध्या तिघांवर नागपूर येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

   या अपघातात गोकुंदा येथील ज्येष्ठ नेते नारायण सिडाम यांचे नातवंड तसेच माजी सैनिक अशोक आबाराव सिडाम यांची कन्या डॉ. रत्नमाला अशोक सिडाम, त्यांचा मुलगा डॉ. कुणाल अशोक सिडाम आणि वाहनचालक अजय लदाडे हे जखमी झाले आहेत. डॉ. कुणाल सिडाम यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी कुटुंबीय गडचिरोली येथे गेले होते. कार्यक्रमानंतर चंद्रपूर मार्गे किनवटकडे परतत असताना हा अपघात घडला.
      घोटी परिसरात अचानक वाहनचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याबाहेर जाऊन जोरात आदळली. अपघाय इतका तीव्र होता की, वाहनाचे या अपघातात मोठे नुकसान झाले असून तिघांनाही गंभीर दुखापती झाल्या. अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना प्रथम आदिलाबाद येथे हलवले. मात्र,प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर येथे रेफर करण्यात आले.
   या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून सिडाम कुटुंबावर ओढावलेल्या संकटाबद्दल सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, संबंधित यंत्रणांनी अपघाताची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp