नांदेड, दि.६ : सर्व जाती-धर्मातील विद्यार्थ्यांसाठी आंबेडकरवादी मिशन, सिडको नांदेड यांच्या वतीने UPSC २०२६ परीक्षेसाठी निःशुल्क मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. नवी दिल्ली येथील नामांकित ‘नेक्स्ट IAS’ संस्थेच्या सहकार्याने हे मार्गदर्शन दिले जाणार असून, पदवीधर विद्यार्थ्यांना याचा लाभ घेण्याचे आवाहन मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी केले आहे.
दररोज सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत हे वर्ग आयोजित करण्यात येणार असून, UPSC २०२६ साठी फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन दिले जाणार आहे. UPSC पूर्व परीक्षा २४ मे २०२६ रोजी होणार असून, अर्ज भरण्याची अंतिम तारीख २४ फेब्रुवारी आहे. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज करून या मोफत वर्गांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मिशन चे प्रमुख दीपक कदम यांनी केले आहे.
गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना IAS, IPS सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये संधी मिळावी या उद्देशाने आंबेडकरवादी मिशन गेल्या दोन दशकांपासून कार्यरत आहे. देशातील २२ राज्यांमध्ये मिशनच्या माध्यमातून १९० हून अधिक विद्यार्थी IAS, IPS, IFS, IRS पदांवर कार्यरत असल्याचा दावा संस्थेकडून करण्यात आला आहे.
नांदेड येथील सिडको परिसरात बाहेरगावच्या मुला-मुलींसाठी वस्तीगृह, मेस आणि अभ्यासिका सुविधा अत्यंत नाममात्र दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रवेशासाठी इच्छुकांनी आंबेडकरवादी मिशन कार्यालय, सिडको नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क क्रमांक : ९२७०७६५५५१, ९२७०८६५५५१, ९३२६९३२०४९.