छत्रपती संभाजीनगर : भारतीय विनय अलंकार धम्मज्ञान प्रशिक्षण केंद्र, भिमटेकडी संचलित जागतिक बौद्ध धम्मपरिषद २०२६ चे आयोजन २६, २७, २८ फेब्रुवारी ते १ व २ मार्च २०२६ दरम्यान करण्यात आले आहे. ही पाच दिवसीय परिषद दररोज सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत पार पडणार आहे.
या परिषदेस भारतासह सुमारे ३० देशांतील बौद्ध भिक्खू व भिक्खुणी संघ सहभागी होणार असून, त्यांचे आगमन विश्वशांती बुद्ध विहार, भिमटेकडी, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या परिषदेच्या माध्यमातून बौद्ध धम्माचा प्रसार, धम्मशिक्षणाचे मार्गदर्शन तसेच जागतिक शांततेचा संदेश देण्यात येणार आहे.
परिषदेचे स्थळ विश्वशांती बुद्ध विहार, भिमटेकडी, जटवाडा रोड, सुभाष नगर, लेणी परिसर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे निश्चित करण्यात आले आहे. विविध देशांतील प्रख्यात भदंत, भिक्खू व भिक्खुणी मार्गदर्शन करणार असून, उपासक-उपासिका तसेच धम्मप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
या भव्य धम्मपरिषदेच्या संयोजिका म्हणून पू. प्रा. भिक्खुणी धम्मदसना महाथेरी कार्यरत असून, कोअर कमिटीचे पदाधिकारी व सदस्य कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत.
जागतिक स्तरावर प्रथमच अशा स्वरूपाची परिषद आयोजित होत असल्याने बौद्ध समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Tags
||महाराष्ट||
