तेलंगणातील आदिलाबादमध्ये कोठारी (चि.)च्या कन्येचा दमदार विजय; नगरसेवकपदी प्रचंड मताधिक्याने निवड


किनवट  : किनवट तालुक्यातील कोठारी (चि.) गावची कन्या सृष्टीका मनोज पवार पाटील यांनी तेलंगणा राज्यातील आदिलाबाद महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३६ मधून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून नगरसेवक पदाची निवडणूक प्रचंड मताधिक्याने जिंकत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

    पवार पाटील या कोठारी (चि.) येथील  सुरेशराव पाटील काकडे यांच्या कन्या तसेच  पवन सुरेशराव काकडे पाटील यांच्या भगिनी असून आदिलाबाद येथील संभाजी पाटील पवार यांच्या सून आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निकालात त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
या निवडणुकीत पवार पाटील यांनी एकूण १,२४८ मते मिळवत प्रतिस्पर्ध्यांवर भक्कम आघाडी घेतली. काँग्रेसच्या उमेदवार लक्ष्मी राजेंद्र गांधी यांना ५०४ मते मिळाली, तर बीआरएसच्या उमेदवार आरिफ अंजुम यांनी ४०० मते मिळवत तिसरे स्थान पटकावले. एआयएमआयएमच्या मुजकिरा मुस्कान यांना १३६ मते मिळाली. सुमारे ४७० मतांच्या फरकाने मिळविलेला हा विजय एकतर्फी आणि दणदणीत मानला जात आहे.
    या ऐतिहासिक विजयाबद्दल आदिलाबाद जिल्ह्याचे आमदार पायल शंकर, किनवटचे आमदार भीमराव केराम, स्वामी प्रॉपर्टीज अँड डेव्हलपर्सचे विशाल स्वामी गोनेवार, सुनील गरुड, संदीप सोपनराव केंद्रे, कोठारीचे माजी सरपंच तुळशीराम देवजी गेडाम, बाळाजी पाटील मुरकुटे, कडपे पाटील, सुधाकर काकडे पाटील, संभाजी पाटील पवार (आदिलाबाद), अरविंद पाटील शिंदे (मांडा), गंगाधर पाटील बिजोरे (दरसांगवी), संदीप पाटील साळुंके (वडोली), लक्ष्मण पाटील अडकेने (राजगड) आणि खंडू पाटील काकडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
या विजयामुळे कोठारी (चि.) गावासह संपूर्ण किनवट तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांकडून सौ. पवार पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या माध्यमातून आदिलाबादमध्ये विकासाची नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp