किनवट : विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा, पाक्षिक व वृत्तपत्रांचे नियमित वाचन करून शिक्षणाच्या माध्यमातून अंधारातून प्रकाशाकडे झेप घ्यावी, असे प्रेरणादायी आवाहन पोलीस निरीक्षक श्री. गणेश कराड यांनी केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळबोरगाव(ता.किनवट) येथे आयोजित ‘झेप’ सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने नुकत्याच आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रानबा पाटोळे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच बाळू गायकवाड, उपसरपंच प्रदीप राठोड, दिलीप बोंबले, ग्रामसेवक पिराजी झटकवडे यांच्यासह पालक, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर, आदिवासी, कोकणी, तेलगू तसेच चिगपट नृत्यांचे आकर्षक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. विविध स्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. परीक्षक म्हणून दत्ता शेवाळकर, अश्वत घुले व विनायक मुंडे यांनी काम पाहिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन केंद्रप्रमुख रमेश खुपसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्रांती सिरमनवार व परमेश्वर बोडके यांनी विशेष परिश्रम घेतले.
Tags
||जिल्हा||

