शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुंदा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात अभिवादन कार्यक्रम



किनवट  : बहुजन प्रतिपालक, कुळवाडी कूळभूषण, लोकराजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त गोकुंदा (ता. किनवट) येथील महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गोकुंदा येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला.

      कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक तथा प्राचार्य प्रमोद मुनेश्वर यांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन केले. उपप्राचार्य राधेश्याम जाधव, उपमुख्याध्यापक किशोर डांगे यांनीही विद्यार्थ्यांना शिवचरित्रातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
   ज्ञपर्यवेक्षक रघुनाथ इंगळे, मनोज भोयर, मुकुंद मुनेश्वर यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. डॉ. हेमंत सोनकांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. सुबोध सर्पे यांनी केले.
शिवजयंतीनिमित्त विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शौर्य व स्वाभिमानाची भावना जागृत करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp