माहूर : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याध्यक्ष माधव बावगे यांच्या प्रमुख उपस्थितीत माहूर येथे नुकतीच महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत माहूर तालुका कार्यकारिणीची नव्याने निवड करण्यात आली असून विविध जबाबदाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये वाटप करण्यात आल्या आहेत.
बैठकीत सर्वानुमते तालुका अध्यक्षपदी मनोज कीर्तने यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून डॉ. बाबाराव डाखोरे व राज ठाकूर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. कार्याध्यक्षपदी गणेश कराळे पाटील, तर सल्लागार म्हणून डॉ. प्रकाश जैन यांची निवड करण्यात आली. प्रमुख सचिवपदी जयकुमार अडकिने यांची नियुक्ती करण्यात आली.
समितीच्या विविध विभागांचीही रचना करण्यात आली. उपक्रम विभागाची धुरा साजिद खान यांच्याकडे देण्यात आली असून वैज्ञानिक जाणीव व शिक्षण प्रकल्प विभागाची जबाबदारी राजेंद्र चारोळे यांच्याकडे सोपविण्यात आली. महिला सहभाग विभागात सरोजा तळवकर यांची निवड करण्यात आली. युवा सहभाग विभागात आकाश कांबळे यांना संधी देण्यात आली, तर विवेक जागर विभागाचे नेतृत्व प्रा. राजेंद्र लोणे करणार आहेत.
याशिवाय प्रकाशन व वितरण विभागासाठी अर्जुन जाधव, अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका विभागासाठी गजानन मगर, मानसिक आरोग्य व्यवस्थापन विभागासाठी डॉ. जगताप, विज्ञान वाहिनी विभागासाठी मिलिंद कांबळे, सोशल मीडिया व्यवस्थापन विभागासाठी एस. एस. पाटील, निधी व्यवस्थापन विभागासाठी राजकुमार , कायदेविषयक व्यवस्थापन विभागासाठी अॅड. अविनाश डोंगे, व्यसनमुक्ती प्रबोधन व संघर्ष विभागासाठी प्रल्हाद चव्हाण, संविधान जागर विभागासाठी अॅड. भारती गजानन शिंदे, सर्वेक्षण व संशोधन विभागासाठी उमेश डाखोरे, दस्तऐवज संकलन विभागासाठी राजिक शेख, तर विवेक वाहिनी विभागासाठी मंगेश जाधव यांची निवड करण्यात आली.
निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले असून समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवादी विचार आणि अंधश्रद्धामुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
राज्याध्यक्षांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ग्रामीण भागात वैज्ञानिक विचारांचा प्रसार आणि संविधानिक मूल्यांची जपणूक ही काळाची गरज आहे. नव्याने निवडलेल्या कार्यकारिणीकडून संघटनेचे काम अधिक प्रभावीपणे पुढे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Tags
||जिल्हा||
