पुणे : “संविधान टिकलं, तर लोकशाही टिकेल! लोकशाही टिकली, तरच देश टिकेल!” या प्रेरणादायी घोषवाक्याखाली संविधानिक मूल्यांवर आधारित मोफत चित्रपट प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा 27, 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत पार पडणार आहे.
ही कार्यशाळा आंबेडकराईट फिल्ममेकर असोसिएशन, संकल्पनी क्रिएशन्स आणि सिल्वर स्क्रीन फिल्म इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे.
कार्यशाळेचा मुख्य उद्देश पर्यायी सांस्कृतिक चित्रपटसृष्टीची उभारणी करणे तसेच संविधानिक मूल्यांचा प्रचार, प्रसार आणि संरक्षण करणे हा आहे. सामाजिक जाणीवा, समानता, बंधुता आणि न्याय या तत्त्वांवर आधारित सशक्त चित्रपट निर्मितीसाठी नवोदितांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
या कार्यशाळेस मार्गदर्शन करणार आहेत दिग्दर्शक, कला दिग्दर्शक व नृत्यदिग्दर्शक संतोष भीमराव संखद. चित्रपट निर्मितीची मूलतत्त्वे, पटकथा लेखन, दिग्दर्शन, कला दिग्दर्शन, नृत्यदिग्दर्शन आणि सामाजिक विषयांवर प्रभावी मांडणी यासंदर्भात सविस्तर प्रशिक्षण दिले जाणार आहे.
कार्यशाळेचे ठिकाण धम्म निनाद बुद्ध विहार, स. नं. 2, मिनी मार्केटजवळ, पोलीस लाईनसमोर, प्रा. रामकृष्ण मोरे उद्यानाच्या आतमध्ये, इंद्रायणी नगर, भोसरी, पुणे येथे आहे.
Tags
||महाराष्ट||
