किनवट, दि. २२: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याध्यक्ष माधव बावगे (लातूर) यांना नुकताच मिळालेल्या प्रतिष्ठेच्या “कर्मयोगी बाबा आमटे राष्ट्रीय पुरस्कार”निमित्त किनवटमध्ये उत्साहपूर्ण सत्कार करण्यात आला.साने गुरुजी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कोठारी (ता. किनवट) येथे २१ फेब्रुवारीला सायंकाळी ४.३० वाजता झालेल्या कार्यक्रमात बावगे यांना मानपत्र, शाल, श्रीफळ, पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. हा सत्कार हॉस्पिटलचे मुख्य डॉ. अशोक बेलखोडे, ज्येष्ठ समीक्षक प्रा. रामप्रसाद तौर यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अशोक बेलखोडे होते. प्रास्ताविक प्रा. डॉ. सुनील व्यवहारे यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. बाबा सूर्यवंशी यांनी प्रभावीपणे सांभाळले. सन्मानपत्राचे वाचन विकास बोलेनवार यांनी केले. अनेक संस्था व व्यक्तींनी बावगे यांच्या कार्याचा विशेष गौरव केला.उत्तरपर भाषणात बावगे यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. समाजप्रबोधन, वैज्ञानिक दृष्टिकोन व संविधानिक मूल्यांचा प्रसार हे आपले ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास डॉ. भाग्यश्री बेलखोडे, डॉ. वसंत भा. राठोड, प्राचार्य डॉ. शिवाजी बेंबरेकर, उपप्राचार्य डॉ. पंजाब शेरे, दिलीप पाटील, वंदना ऊईके, संजय बोलेनवार, मनोज चनमनवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षीय समारोप डॉ. अशोक बेलखोडे यांनी केला, तर आभार अजय जाधव यांनी मानले.हा सत्कार सोहळा समाजप्रबोधनाला प्रेरणादायी ठरला
Tags
||महाराष्ट||
