चेंबूरमध्ये मातोश्री रमाई आंबेडकरांच्या नावासाठी आमरण उपोषण; नागरिकांचा वाढता पाठिंबा

मुंबई : बहुजन लोकनिर्धार सामाजिक संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. राकेश म. गायकवाड यांच्या वतीने चेंबूर नाका येथे मातोश्री रमाई आंबेडकर प्रसूतीगृहाबाहेर मंगळवार, दि. 03 फेब्रुवारी 2026 पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. चेंबूर नाका बस थांब्याला ‘मातोश्री रमाई आंबेडकर प्रसूतीगृह’ असे नाव देण्यात यावे तसेच प्रसूतीगृहाच्या आवारात मातोश्री रमाई आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.

उपोषणस्थळी परिसरातील अनेक नागरिकांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला आहे. समाजसेवक विवेक काकडे, प्रशांत दवटे, संतोष साळवे यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले असून प्रशासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी शासन व प्रशासनाने मागण्या तत्काळ मान्य कराव्यात, अन्यथा या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटतील, असा इशाराही दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp