
देवानंद सरोदे- जिल्हाध्यक्ष
नांदेड, दि.५ : महाराष्ट्र राज्य रेशन व केरोशीन दुकानदार महामंडळ, नाशिक, जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने रेशन दुकानदारांच्या अडीअडचणी, मार्जिन वाढ व इतर प्रलंबित मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे निवेदन शुक्रवारी, दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १२.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे सादर करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेतर्फे देण्यात आली.
रेशन दुकानदारांना भेडसावणाऱ्या विविध प्रशासकीय समस्या, आर्थिक अडचणी तसेच मार्जिन वाढीसंदर्भातील मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, यासाठी हे निवेदन दिले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेचे सर्व पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते तसेच जिल्ह्यातील रास्त भाव दुकानदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या मागण्यांना बळ द्यावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष देवानंद सरोदे यांनी केले आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील रेशन दुकानदारांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय व्हावा, यासाठी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे, अशी विनंतीही संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
Tags
||जिल्हा||